नोकरी नाल्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा चवथे दिवशी आढळून आला त्याचा मृत्यूदेह

48

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
*नोकरी बुजरूक येथील संजय कंडलेवार वय 50 वर्ष व्यक्ती दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 9 वाजता नोकारी बु.(माईंस) येथील नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला होता त्याचा पोलीस शोध पथक व स्थानिक लोकांनी शोध करीत होते आज चवथे दिवशी अमलनाला धरणात शंकरदेव समोर भागात आढळून आला.

शंकर कंडलेवार हा गावाकडे परत येत नाल्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहात वाहून गेला माहिती मिळताच दोनही बाजुने अमलनाला धरणा पर्यंत व धरणात शोध घेतला असता कुठेच आढळून आला नाही व शोध घेण्यासाठी 11जुलै रोजी नोकारी बु. व अमलणाला धरण येथे चंद्रपूर येथील चंद्रपूर पोलीस विभागाचे शोध पथक दाखल झाले व शोध घेतला असता त्याना सुध्दा या शोधात यश येत नव्हते पावसाचे व पुराचे वाढते प्रमाण पाहता शोध घेण्यात अडथळा निर्माण होत आहे .अखेर आज त्याचा मृत्यूदेह तरंगताना आढळून आला पोलिसांनी प्रेत बाहेर काढून पुढील कार्यवाही गडचांदूर पोलीस करीत आहेत.