
डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे एका २ वर्षीय बालकाचा गडचिरोलीच्या महीला रूग्णालयात मृत्यू झाल्यामुळे या डॉक्टरवर गुन्हा दाखल करून निलंबीत करावे अशी मागणी मृतकाचे पालक आशिष प्रधाने, आजोबा भंजदेव यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्हयातील सावली येथिल पार्थ आशिष प्रधाने या २ वर्षीय बालकाला त्याच्या कुटुंबीयांनी पहाटे ४.०० वाजता उपचारासाठी गडचिरोली येथिल महिला रूग्णालयात दाखल केले. परंतु यावेळी एकही डॉक्टर हजर नव्हते. डॉक्टर तारकेश्वर उईके यांची नेमणूक असतांना ते ड्युटीवर हजर नव्हते. वारंवार फोन करूनही डॉक्टर आले नाही.
डॉक्टर उईके आज सकाळी ७. ४५ वाजता आले. तोपर्यंत बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात मृतकांच्या कुटुंबीयांनी जिल्हा शल्य चिकित्सक व पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली त्यानूसार चौकशी सुरू केली व मृतकाचे शव पोस्टमार्टमसाठी पाठविले.
