विरुर पोलिसांच्या प्रयत्नाने पुरात अडकलेल्या ट्रॅव्हल्स मधील प्रवाश्याना जीवदान

50

 

राजुरा(संतोष कुंदोजवार)-

हैदराबाद कडून चिंचोली विरुर मार्गे छत्तीसगड कडे जाणारी ट्रॅव्हल्स चिंचोली नाल्यात अडकल्याने प्रवाश्याचा जीव टांगणीला लागला होता परंतु विरुर पोलिसांना माहीत होताच लगेच मदत करीत मोठ्या परिश्रमातून सर्व प्रवाशांना बाहेर सुखरूप काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला
तेलंगणात कामासाठी गेलेले मजूर परत आपलय छत्तीसगड राज्यात खाजगी ट्रॅव्हल्स ने निघाले तेलंगणातील शिरपूर मार्गे चिंचोली विरुर मार्गे येत असताना चिंचोली नाल्यातील पुलावर पाण्याचा अंदाज न घेता ट्रॅव्हल्स टाकली आणि त्यात फसली सगळीकडे पाणीच पाणी जीव वाचविण्याची धडपळ सुरू झाली एकाने पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करून माहिती दिली विरुर पोलिसांना संदेश आला आणि क्षणाचाही वेळ न लावता सहायक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण आणि पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी घटनास्थळी जाऊन रेस्क्यू मोहीम सुरू केली काही ग्रामस्थाच्या मदतीने मोठ्या प्रयत्नाने जीव धोक्यात घालून बस मधील 25 लहान बालकासह पुरुष महिला प्रवाश्याना सुखरूप बाहेर काढले लगेच त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली
पोलिसांच्या या कार्याची सर्वत्र कौतुक होत आहे