लोकनेते दिवंगत वामनराव गड्डमवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ रुग्णांना फळे वाटप

44

 

भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी राज्यमंत्री दिवंगत श्रद्धेय वामनरावजी गड्डमवार लोकनेते होते. सर्वसामान्य शेतकरी नेते होते .

ग्रामीण वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शिक्षण संस्था उभारल्या गड्डमवार साहेबांचे कार्य मोलाचे असून सावली तालुक्याच्या निर्मितीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती असे विचार माननीय भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मान. राजाबाळ पाटील संगीळवार यांनी व्यक्त केले राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सावली द्वारा आयोजित श्रध्देय वामनरावजी गड्डमवार साहेब यांच्या आदरांजली व फळ वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल स्वामी, संस्थेची कोषाध्यक्ष डॉक्टर विजयराव शेंडे,महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे सदस्य डॉ. ऐ चंद्रमौली इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्रद्धेय वामनरावजी गड्डमवार साहेब यांना आदरांजली व्यक्त केल्यानंतर ग्रामीण रुग्णालय सावली येते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ. वागधरे , डॉ. विजयराव शेंडे, डॉ. ऐ. चंद्रमौली यांच्या हस्ते रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले याप्रसंगी डॉ. अशोक खोब्रागडे, प्रा. प्रशांत वासाडे, विनोद बडवाईक, प्रा. देवीलाल वाताखेरे, डॉ. राजश्री मार्कंडेवार, डॉ. प्रेरणा मोडक, प्रा. विजयसिंग पवार, प्रा. सगानंद बागडे प्रा.संदीप देशमुख, डॉ. रामचंद्र वासेकर, डॉ. सचिन चौधरी, प्रा. प्रकाश घागरगुंडे , प्रा. किरण बोरकर, प्रा. मुकेश निखाडे, डॉ. रागिनी पाटील प्रा. आशिष शेंडे, प्रा. स्मिता राऊत तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आदरांजली कार्यक्रमांचे संचालन डॉ. रामचंद्र वासेकर यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. भास्कर सुकारे, संजय पडोळे यांनी सहकार्य केले.