बेटाळा येथील शेतकरी भुतीनाल्यात वाहून गेला ; अद्यापही शोध मोहीम सुरूच

45

 

ब्रह्मपुरी: तालुक्यातील बेटाळा येथील नवलाजी पांडुरंग तुपट वय (५६) वर्ष हा शेतकरी अचानक भूतीनाल्याला वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्याची घटना१० जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

 

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार बेटाळा- रनमोचन यांच्या मधोमध भुतिनाला असून मुख्यते पावसाळ्याच्या दिवसात हा नाला पाण्याच्या प्रवाहामुळे तुडुंब भरून वाहतो बेटाळा येथील शेतकरी नवलाजी तूपट यांचे शेती रणमोचन शेत शिवारात असून त्यांना शेती करण्यासाठी नाला ओलांडून शेतीला जाण्यासाठी मार्गक्रमण करावे लागते नेहमीप्रमाणे बेटाळा येथील शेतकरी नवलाजी तुपट शेतीवर जाण्यासाठी निघाले परंतु अचानक भूती नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नऊलाजी वाहून गेले ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरतात परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात त्यांना बघण्यासाठी गर्दी केली होती मात्र २४ तासाचा कालावधी लोटून सुद्धा अद्यापही वृत्तलिहस्तोपर्यंत मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले नव्हते.

चंद्रपुराहून नावेच्या साह्याने शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळ अधिकारी भाकरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.