
.

सोलापूरातील पद्मशाली समाजातील १० वी आणि १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
माधव नगर जवळील पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या बुर्ला मंगल कार्यालय येथे रविवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे, पद्मशाली फौंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल, निवृत्त पोलीस निरीक्षक बाबू गंधमल, एमराया फार्मास्युटिकल्स आणि फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्ष माधवी अंदे, अॅड. मनोज पामूल, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी कार्यकारिणी विश्वस्त सदस्य व्यंकटेश कोंडी, दयानंद कोंडाबत्तीनी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी समाजातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी जवळपास १०० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पद्मशाली फौंडेशनच्या वतीने वह्या आणि पेन भेट देऊन गौरविण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मार्कंडेय जनजागृती संघटनेचे अध्यक्ष किशोर व्यंकटगिरी, फाउंडेशनचे सल्लागार सुकुमार सिध्दम काका, उपाध्यक्ष नागेश पासकंटी, श्रीनिवास कामुर्ती, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी कार्यकारिणी विश्वस्त सदस्य श्रीनिवास रच्चा यांचे सहकार्य मिळाले. यावेळी पद्मशाली फौंडेशनचे पदाधिकारी, पद्मशाली सखी संघमच्या महिला पदाधिकारी आणि सदस्या, श्री मार्कंडेय जनजागृती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मार्कंडेय आडम यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
