
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी)गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील व ब्रह्मपुरी येथे किरायाच्या घरांमध्ये राहून बेटाळा डी फार्म कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या ऐश्वर्या दिगंबर खोब्रागडे नामक युवती गेल्या दहा महिन्यापासून बेपत्ता झाली होती सन २०२१ मध्ये त्यांच्या घरच्यांनी मिसिंग तक्रार ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन मध्ये दाखल केली होती त्या आधारे पोलिसांची तपास यंत्रणा कार्यरत असतांना दिनांक ७जुलै रोजी २०२२ रोजी ब्रह्मपुरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या हरदोली गावाजवळ वैनगंगा नदीच्या किनारी असलेल्या पाण्याच्या टाकीत ऐश्वर्याचा मृतदेह आढळून आला होता.

त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत तुषार उर्फ तरुण राजु बुज्जेवार रा. वडसा या आरोपीला अटक केली होती मात्र या खुनातील मुख्य आरोपी फरार होता आरोपीला शोधण्यासाठी विशेष पथक तयार करून आरोपी नामे संदीप उर्फ दुर्गेश रेखलाल पटले याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अजून पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले आहे
या अगोदर सन२०१८ मध्ये वडसा पोलीस स्टेशन मध्ये खुनाच्या गुन्ह्यात तर गोंदिया पोलीस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्ह्याची नोंद आरोपीवर आहे
पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२,३६४,२०१,३४, भांदवी सह (३)(२)(v) अ.जा.अ. प्र.का. अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व मुलचे पोलीस उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे (अतिरिक्त कार्यभार ब्रह्मपुरी) तसेच ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे, पोहवा/अंकुश आत्राम, नपो सचिन बारसागडे, मुकेश गजबे, योगेश शिवणकर, पो.शि. विजय मैन्द, संदेश देवगडे,अजय कटाईत , व ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले सध्या ब्रह्मपुरी अतिरिक्त कार्यभार विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे अधिक तपास करीत आहेत.
