सात दुचाकी चोरास देवई येथून घेतले ताब्यात ; राजुरा डी बी पोलिसांची कारवाई

111

राजुरा(प्रतिनिधी)-
मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना राजुरा तालुक्यात घडल्या त्याची गँभिर दखल घेत राजुरा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक(डीबी) यातील आरोपीच्या शोधात होते दरम्यान गुप्त माहितीवरून पोंभुरणा तालुक्यातील देवई गावातील 39 वर्षीय पंकज भाऊजी टेकाम यास 2 लाख 30 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकीसह ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.

जप्त केलेल्या दुचाकीच्या 2 लाख 30 हजार रुपये किंमत असून पुढील तपास सुरू आहे
ही कारवाई पोलीस अधीक्षक ,अप्पर पोलीस अधीक्षक यांचे आदेशानवे उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार,पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहाद्दूरे यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे हवालदार खुशाल टेकाम,रवींद्र नक्कनवार,किशोर तुमराम,शिपाई महेश बालगोडवार,योगेश पिदूरकर,रामराव बिंगेवाड यांनी केली