सावली शहरातील पद्मावती नगर, व बालाजी नगर पाण्याखाली ; नप च्या ठिसाळ नियोजनाचा नागरिकांना फटका

74

 

सावली शहरात आज सकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे प्रभाग क्र.1 मधील बालाजी नगर व प्रभाग क्र. 12 मधील पद्मावती नगर येथे प्रचंड प्रमाणात पाणी साचून अनेकांचे घर पाण्याखाली गेले. त्याचप्रमाणे या भागातील रस्ते तर दिसेनासे झाले होते शिवाय नागरिकांना घराबाहेर निघणे ही अशक्य झाले.

नगरपंचायत सावली च्या ठिसाळ नियोजन मुळे या भागात रखडलेली विकास कामे हेच आहे. या प्रभागात सिमेंट काँक्रिट चे एकही रोड अथवा नाली नाही याशिवाय प्रशासनाने पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला जी उपाययोजना करायला पाहिजे ते सुद्धा केलेलं नाही. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात रस्ते चिखलमय होतात. अश्या रस्त्यांवरून गाडी ने जाणे तर दूरच, चालत जाताना ही कित्येकदा पाय घासरून लोक पडली आहेत.
आज सकाळी आलेल्या जोरदार पावसाने सर्वत्र प्रभाग क्रमांक 9,14 मध्ये ही अनेकांच्या घरात पाणी घुसल्याचे दिसत आहे.तसेच जोरदार पावसाने सावली शहरातील काही जणांचे घरेही कोसळलेली आहे.

बालाजी नगर मधील वसाहतींना शेती लागून असल्याने नागरिकांना साप, किडे, विंचू यांसारख्या प्राण्यांची भीती आहेच शिवाय रानटी डुकरांचा ही त्रास आहे. तरी या सर्व गोष्टींना जबाबदार कोण ? कमीत कमी या भागात काँक्रिट चे रस्ते व नाली चे कामे पूर्ण झाले व पथदिवे नियमित सुरू राहतील तर पावसाळ्यात नागरिकांना होणारा हा त्रास जरा कमी होईल. याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सावली तालुक्यात सर्वत्र पाऊस असल्याने आज पेंढरी मक्ता येथील गावामध्ये पाऊसाच्या पाणी गावात घुसल्याने मोठी तारांबड उडाली तसेच केरोडा येथे ही अशीच परिस्थिती होती.