अमृत महोत्सव अंतर्गत बल्हारशाह वनक्षेत्रात एकदिवसीय ऑनलाइन रोपवन कार्यक्रमात 275 रोपांची लागवड

46

 

राजुरा(संतोष कुंदोजवार)-

अमृत महोत्सव अंतर्गत ऑनलाइन मोहिमेत सहभागी होत बल्हारशाह वनपरिक्षेत्रात लोकप्रतिनिधी, वनकर्मचारी,विद्यार्थी,शिक्षक , सामाजिक संस्था सदस्य,वन्यप्रेमी च्या सहकार्याने 35 हेक्टर क्षेत्रात सामूहिक वृक्षारोपवन करण्यात आले.

अमृत महोत्सव अंतर्गत वनविभाग सहभागी होत यावर्षी एकाच दिवशी राज्यभर वनक्षेत्रात रोपवन करण्याचा निर्णय घेतला आणि हे रोपवन कार्यक्रमाचे ऑनलाइन नोंद घेण्यात आली,त्यानुसार आज बल्हारशाह वनपरिक्षेत्र अंतर्गत बल्हारशाह ते कारवा मार्गालगत मिश्र रोपवन करण्यात आले या हरियाली महोत्सवात वनविकास महामंडळ चे माजी अध्यक्ष चदनसिंग चंदेल हे अध्यक्ष म्हणून होते तर माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा , मुख्यवनसरक्षक प्रकाश लोणकर,विभागीय वनअधिकारी बडेकर,सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते ,भजन दिंडीच्या आवाजात मान्यवरांचे हस्ते या वनक्षेत्रात रोपवन करण्यात आले,यात बालाजी हायस्कुल चे विद्यार्थी शिक्षक,गुरुनानक महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थी,लोकमत सखी मंच सदस्य,सामाजिक कार्यकर्त्यासह, वन कर्मचारी,मजूर सहभागी झाले होते
यावेळी साग,शिसम,बांबू,कलंब आदी प्रजातीचे 275 रोपांची आज लागवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी केले ,संचालन क्षेत्र सहायक विजय रामटेके यांनी करणे तर क्षेत्र सहायक कोमल गुगलोत यांनी आभार मानले यावेळी बल्हारशाह वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सर्व वन कर्मचारी उपस्थित होते