
सावली तालुक्यातील हरांबा लोंढोली,जिबगाव, साखरी मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडले आहे.

या मार्गावरील मोठे खड्डे धोकादायक ठरत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने मोठ्या खड्यात नेमका पाणी किती आहे हे लक्षात येतं नाहीं हेच खडे अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे.या पाणी जमा असलेल्या आज सकाळी च दोन दुचाकी स्वाराचा अपघात झाला आहे.
जिबगांव,हरांबा परीसरातील नागरीकाचे तालुक्याच्या ठिकाणी सावली मध्ये तहसिल कार्यालय,महाविद्यालया,शाळा, ग्रामीण रुग्णालयात,बाजार पेठ करीता दररोज ये-जा असते. तसेच रात्री व दिवसा मोठ्या प्रमाणात वाहनाची रेलचेल सुरू असते.
त्यामुळे रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य झाले असून रस्त्यांवर दुरवस्था झाली आहे.रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण उखडले असून दोन ते तीन फुटाचे पसरट खड्डे पडले आहेत तर गोसेखुर्द विभागाचे वतीने अतर्गत पाईप लाईन चे काम झाले मात्र रोड वर थातूर मातूर काम केल्याने या मार्गावर मोठे खड्डे पडले असून वाहन चालकास वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रस्त्याची एवढी दुरवस्था झाली आहे असून सावली बांधकाम विभागचे दुलर्क्ष करीत असल्याचे दिसत आहे.असा आरोप वाहन धारकांकडून केला जात आहे . तेव्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देउन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे.
