घोरपळ व चितळाची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावणाऱ्या चार आरोपींना अटक

56

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
गुप्त माहितीवरून सापळा रचून चितळ व घोरपळ या वन्यजीवांची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावणाऱ्या चार आरोपींना काल दिनांक 7 जुलै रोजी रात्री वनकर्मचार्यानी धाड टाकून चुनाला येथील 2 व बामनवाडा 1आणि राजुरा येथील 1 अश्या 4 आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन वनगुन्हा दाखल केला आहे
काल सायंकाळी राजुरा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना। चितळाची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावणे सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी अधिनस्त वनकर्मचार्याना घेऊन अतिशय सावधपणे सापळा रचून धाड टाकली प्रथम चुनाला येथील मदन मोरे याचे घरी धाड टाकले असता मास शिजविण्याचे तयारीत असतानाच रंगेहात पकडले त्याचे कडून अधिक सहभागी आरोपी बद्दल विचारणा केली असता इतर लोकांची माहिती दिली त्यानुसार चुनाळा येथील विजय मोंडे, बामनवाडा येथील आकाश आत्राम ,राजुराचे बेगरवस्ती वार्डातील सुका उर्फ गोपी आत्राम या आरोपीनाही ताब्यात घेतले धाडीत चितळाची आणि घोरपळीचे मास,कुऱ्हाड,विडा हा मुद्देमाल जप्त केला
आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमांनव्ये वनगुन्हा दाखल केला असून आरोपींना न्यायालयात हजर करुन पुढील कारवाई केली जाणार आहे
ही कारवाई उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू ,उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी ,क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते,नरेंद्र देशकर,वनरक्षक देवानंद शेंडे,सुनील गजलवार,सुनील मेश्राम,संजीव सुरवसे,अर्जुन पोले, सायस हाके,सुलभा उरकुडे,वनमजुर गंगाधर मोहितकर,मयूर आत्राम,चालक मंगल पंचभाई यांनी केली