विद्युत च्या शॉक ने सुरक्षा रक्षक जळला; गंभीर जखमी झाल्याने नागपुरात हलविले

145

 

सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील रहिवासी चेतराम रघुनाथ मानकर वय ३५ वर्ष हा महावितरण कार्यालय सावली अंतर्गतच्या चकपिरंजी येथील ३३ केवि विद्युत वितरण वाहिनी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून मागील १३ वर्ष पासून कार्यरत आहे.

दिनांक ३/७/२२ रोजी नेहमी प्रमाणे रात्रो ८.०० वाजता चक पिरंजी येथील ३३ केवि विद्युत वाहिनीच्या कामावर गेला होता. कामावर हाजर होताच तिथे कार्यरत अधिकारी यांनी बंद पडलेला विद्युत प्रवाह सुरु करणे आणि रीडिंग घेणे बाबत काम सांगितले.

अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आदेशानुसार सुरक्षा रक्षक चेतराम मानकर हा विद्युत प्रवाह सुरु करावयास गेला असता शार्ट सर्किट होऊन डीपी जळाल्याने अग्निज्वाला बाहेर निघून चेतराम याचे शरीर, हात पाय जळाले व विद्युत शॉक लागल्याने तो बेहोशीत खाली पडला. कार्यालयातील इतर कर्मचारी यांनी जखमी ला सावली च्या ग्रामीण रुग्णालयात नेले परंतु तिथून त्याला रेफर करून चंद्रपुर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. घडलेल्या घटनेची प्राथमिक माहिती महावितरण कार्यालया मार्फत पोलीस स्टेशन सावली येथे दिली असता तर प्राथमिक स्वरुपात गुन्हा नोंद करून घेतला असल्याचे ठाणेदार सावली यांनी सांगितले. परंतु दवाखान्यातून येणाऱ्या रिपोर्ट प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास करण्यात येईल अशी माहिती दिली.

चेतराम मानकर गंभीर जखमी झाल्याने त्यास चंद्रपुर वरून नागपूर येथील दवाखान्यात हलविण्यात आले असून औषध उपचार सुरु आहे. मात्र महावितरण कार्यालय आणि सुरक्षा रक्षक कंपनी यांचे कडून चेतराम मानकर यास कोणतीही मदत देत नसल्याबाबत चेतराम ची आई शकुंतला मानकर आणि पत्नी वैशाली मानकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.चेतराम मानकर यास आर्थिक मदत देण्याबाबत विनंती केलेली आहे.

सिक्युरिटी गार्ड ला फीडरचे काम करण्याचा अधिकार नाही. विद्युत प्रवाह सुरु करणे किंवा बंद करणे हा देखील अधिकार नाही. तरीपण एम.एस.ई.बि. कार्यालयाकडून हे सर्व काम करवून घेतल्या जातात हा गुन्हा आहे. याकडे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्यतेणे लक्ष द्यावे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.