Home
Homeमहाराष्ट्रकृषीपंप जोडणी तात्काळ निकाली काढा.

कृषीपंप जोडणी तात्काळ निकाली काढा.

 

 

 

जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे मा.खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विघुत समितीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी मा.संजयजी मीना व अधिक्षक अभियंता, तसेच विद्युत अभियंता, विद्युत विभागातील अधिकारी यांना दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना तसेच सौभाग्य योजनेअंतर्गत घरगुती वीज जोडणी अशा केंद्रशासनाच्या संबंधीत योजनांची माहिती देण्यात आली.
वनविभागाने विद्युत कंपनीस अखंडित पुरवठा सुरु ठेवण्याकरिता सहकार्य करावे.कृषीपंपांना तात्काळ पुरवठा करावा. गडचिरोली जिल्ह्यातील कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा त👌सेच रात्रीच्या वेळेस शेतामध्ये उजेड राहण्याकरिता सिंगल फेज विज पुरवढा करण्यात यावा. आष्टी, चामोर्शी, मार्कंडा, गावाकरिता स्वतंत्र विद्युत वाहिनी उभारणी करावी. अहेरी उपकेंद्रा करीता निधी मागणीचा प्रस्ताव त्वरित सादर करावा.जिल्ह्यात डोंगराळ व आदिवासी भागाकरिता 30% टक्के अधिक निधी द्यावा.

कार्यान्वित झालेल्या उपकेंद्राचे लोकार्पण करावे. आदिवासी व जंगल भागांमध्ये भूमिगत केबल टाकण्यात यावा. अखंडित वीजपुरवठा सुरु ठेवण्याकरिता सर्व वाहिनी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीन राहावे.
गांगलवाडी व आरमोरी वाहिनी करिता टॉवरची उभारणी करावी. प्रलंबित कृषिपंपांना विघुत पुरवठा करणे. धानोरा येथे 132 के.व्ही पुरवठा उभारणे.सिरोंचा येथील 132 के.व्ही उपकेंद्रकरीता वाहिनी उभारण्याचे काम त्वरित करावे.
असे निर्देश खा.अशोकजी नेते यांनी दिले.
कृषी पम्प धारकांना एप्रील 2018 पासुन नविन विद्युत जोडणी देण्यात आली नाही. महाराष्ट्र राज्याची नविन कृषी पम्प ए. जी. 2020 योजना कुचकामी ठरत आहे त्यात शेतकऱ्याला स्वतः खर्च करून विद्युत पोल टाकावे लागतात त्याकरीता लागणारी खर्चाची रक्कम ही त्यांच्या बिलातुन वापस केल्या जाते. आपल्याकडे मोठे व सदन शेतकरी नसल्यामुळे 99% शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे.
जिल्हा मुख्यालयात विद्युत वाहीनी एच.टी आणि एल टी वायरींग हे अंडरग्राऊंड पध्दतीने करणे बाबत.
गडचिरोली जिल्हा हे जंगल युक्त भुभाग असल्यामुळे जास्तित
जास्त विद्युत वाहीन्या जंगलातुन गेलेल्या आहेत, त्यामुळे
प्रवाह खंडीत होते. जंगल परिसरातुन गेलेल्या विद्युत वाहीन्या कोटेड कंडक्टर वापरून टाकण्यात यावे, जेणे करून वारंवार विज पुरवठा खंडित होणार नाही.
गडचिरोली शहराची वाढती लोकसंख्या आणि नव नविन तयार
होणाऱ्या वस्त्या पाहता भविष्याच्या दृष्टीने आरमोरी रोडवर 33 केव्ही
उपकेंद्र उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात यावे. 5. नविन विद्युत जोडणी करीता सिंगल फेज आणि थ्रि फेज मिटर • उपलब्ध नाहीत ग्राहकांनाच नविन मिटर बाजारातुन विकत घ्यायला लावले जात आहे, ग्राहकांना मिटर त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे.
उपकेंद्र मधुन निधणारे 11 के.व्ही. फिडर हे मिक्स पध्दतीचे आहेत (ए.जी. आणि रहिवासी वापराकरीता एकच फिडर ) त्यातील ए.जी. फिडर वेगळे करण्यात यावे. जेणेकरून गावातिल किंवा शहरातील
लोकांना वारवार विज खंडीत होण्याचा त्रास होणार नाही. शेतीला सुध्दा योग्य दाबाचा विद्युत पुरवठा मिळेल.
अती दुर्गम नक्षलग्रस्त भागातील आदिवासी वस्त्याचे किंवा टोल्यांचे त्वरित विद्युतीकरण करण्यात यावे त्याकरीता काही अडीअडचणी असल्यास कळवावे. ( कामे करतांना वन विभाग फार मोठी अडचन ठरत आहे. गावापर्यंत जाण्याकरीता मार्ग नसल्यामुळे कामाकरीता लागणारे साहीत्य नेण्याकरीता फार मोठी कसरत करावी.अशा पद्धतीची उपाययोजना करावी.असे विद्युत विभागातील अधिकाऱ्यांना निर्देशित केले.
याप्रसंगी खा.अशोकजी नेते.मा.जिल्हाधिकारी संजयजी मीना,गाडगे साहेब अधिक्षक अभियंता,रेखाताई डोळस महिला आघाडीच्या प्रदेश सदस्या,हेडाऊ साहेब,डोंगरवार साहेब, तसेच अनेक विद्युत अधिकारी उपस्थित होते.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !