
राजुरा(संतोष कुंदोजवार)-
दिनांक 6 जुलै रोजी गडचांदूर उपक्षेत्रातील वन खंड क्रमांक 31 मधील वेस्ट वेअर नाला परिसरातून रानडुक्कराची शिकार करून मांसाची विल्हेवाट करणाऱ्या एका शिकारी आरोपीस गडचांदूर वन कर्मचाऱ्यांनी मुद्देमालास अटक केली असून वनगुन्हा दाखल केला आहे.

गुप्त माहितीवरून वनसडी वनपरिक्षेत्र अंतर्गत गडचांदूर उपक्षेत्रातील वन खंड 31मधील नाला परिसरात काही लोकांनी रानडुक्कराची शिकार केल्याची माहिती मिळाली लगेच वनकर्मचारी मोक्यावर जाऊन धाड टाकली असता डुकराची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावीत असताना बिरशाव मडावी या आरोपीस ताब्यात घेतले सोबत सुमारे 25 किलो मास व शिकारीत वापरलेले हत्यार जप्त करून पंचनामा केला व वनगुन्हा दाखल करून अटक केली आहे
ही कारवाई उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणा चौधरी यांचे नेतृत्वात क्षेत्र सहायक दिनकर टोंगे, वनरक्षक आकाश राठोड,विजय ताकसांडे, व्यंकटी जेलेवाड आणि वनमजुरांनी केली पुढील तपास सुरू आहे
