निमगांवात घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष !

32

 

सावली तालुक्यातील निमगाव येथील वॉर्ड क्रमांक 1 मधील केवळराम झाडे यांच्या घरासमोर शेणखताचे खड्डे असून त्या खड्यामुळे लहान मुलांच्या जीवातास तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याचा संभव नाकारता येत नाही, आता पावसाळ्याचे दिवस असून त्या खड्यात पाणी साचलेला आहे, त्या खड्यात कोणाच्या जीवाला व आरोग्याला धोका झाल्यास याला सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासन असेल,वारंवार कळवून सुद्धा याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने यावर तात्काळ कारवाही करावी अशी मागणी केवळराम झाडे, विठ्ठल झाडे व वासुदेव खेडेकर यांनी केली आहे.