
कवठी :- कवठी येथील तरुण व्यक्ती दिनेश बट्टे मागील काही दिवसांपासून कॅन्सर आजाराने ग्रस्त आहे. त्यांच्या कुटूंबात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असून दिनेश कुटूंब प्रमुख असल्याने घरची सर्वच जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र मागील काही दिवसांपासून कॅन्सर च्या आजाराने ग्रस्त असल्याने त्यांची आर्थिक स्थिती आणखी बिकट होत असल्याने घर चालवायला, दवाखाना, औषधं उपचार, करायला आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत, हे गावातील “जय शिवराय गणेश मंडळ” सदस्यांना कळाले. सर्व सदस्यांनी याची दखल घेत त्यांच्या घरी जाऊन ५००० रुपये एवढी रोख रक्कम देऊन आर्थिक मदत करून आर्थिक व सामाजिक धीर दिले. याप्रसंगी दिनेश च्या घरातील सर्वच लोकांनी गावातील गणेश मंडळाचे आभार मानले.
यावेळी जय शिवराय गणेश मंडळाचे अध्यक्ष बंडू श्रीकोंडावार, उपाध्यक्ष लोमेश घोटेकार, सचिव नितीन जवादे, शिक्षक संजय राऊत सर, सदस्य मेघराज घुबडे, शैलेश घोटेकार, रवींद्र श्रीकोंडावार, प्रवीण अहेरपल्लीवार, नरेश श्रीकोंडावार व गणेश मंडळाचे सर्व सदस्य तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. हे कौतुकास्पद कार्य केल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक केल्या जात आहे हे विशेष.
