
राजुरा (संतोष कुंदोजवार)-
आज दिनांक 4 जुलै रोजी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजने अंतर्गत असलेल्या गावातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवती करिता रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने उप वनसंरक्षक मध्यचांदा वनविभागाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन वन उद्यान वनपरिक्षेत्र कार्यालय राजुरा येथे आयोजित करण्यात आले होते.

सदर कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शिका म्हणून प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई यांचे प्रतिनिधी भारती प्रजापती यांनी युवक युवतींना मोलाचे मार्गदर्शन केले व प्रशिक्षणाला हजर राहण्याकरिता संबोधित केले. सदर कार्यक्रमादरम्यान वनपरिक्षेत्र कार्यालय राजुरा बल्लारशा व विरुर या परीक्षेत्रातील युवक युती मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू
यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय वनाधिकारी अमोल गरकल ,सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत पवार ,पर्यावरण प्रेमी संस्था अध्यक्ष बादल बेले हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी केले संचालन क्षेत्र सहायक नरेंद्र देशकर यांनी केले तर वनरक्षक सुनील गजलवार आभार प्रदर्शन यांनी केले
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी बलहारशाह चे नरेश भोवरे,विरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार,क्षेत्र सहाय्यक प्रकाश मत्ते,संतोष संगमवार,सर्व वनरक्षक,वनमजुर यांनी सहकार्य केले
या कार्यशाळेत संयुक्त वन व्यवस्थापन समिती असलेल्या राजुरा, बल्हारशाह, विरुर, वनपरिक्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक मोठ्या संख्येत या कार्यशाळेचा लाभ घेतला
