Home
Homeमहाराष्ट्रखासदार अशोकभाऊ नेते व आमदार डॅा. रामदासजी आंबटकर यांचा वाढदिवस नागभीड तालुक्यात...

खासदार अशोकभाऊ नेते व आमदार डॅा. रामदासजी आंबटकर यांचा वाढदिवस नागभीड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा ..

 

==================

गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार व भाजपा अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री अशोकभाऊ नेते व चंद्रपुर – वर्धा – गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेतले विधानपरिषद सदस्य आमदार डॅा. रामदासजी आंबटकर यांचा वाढदिवस नागभीड तालुक्यांतील अनेक गावात भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे यांच्या उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रम घेत संपन्न करण्यात आला.

नागभीड तालुक्यातील कोथुळणा येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले तर गावातील वृध्दांना बांबुची आधारकाठी देण्यात आली .

याप्रसंगी १५ व्या वित्त आयोगातुन प्राप्त फॅागींग मशीन व ई रिक्षा घनकचरा गाडीचे ग्रामपंचायतीला लोकार्पण करण्यात आले . यावेळी भाजपा तालुका महामंत्री सुनिल शिवणकर , ग्रा.पं. सरपंच सौ. मंजुषाताई डाहारे , सदस्य बंडुजी शेंडे , दौलत शिवणकर व छायाताई मेंढे , सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष संतोष पिसे , माजी सरपंच सौ. रेखाताई मेंढे , आंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती वैशालीताई शिवणकर , शाळेचे मुख्याध्यापक चौधरी सर , सहा. शिक्षक सायरे सर, ज्ञानेश्वर भेंडारकर , वामनराव हुकरे व अन्य गावकऱ्यांची उपस्थिती होती.

ग्रा.पं. मिंथुर येथे वाढदिवसाचे औचित्य साधून माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांच्या पाठपुराव्याने जनसुविधा निधीअंतर्गत मंजुर झालेल्या स्मशानभुमीकडे जाणाऱ्या सिमेंट कॅांक्रिट रस्त्याचे भुमीपुजन संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले . जनसुविधा निधीतुनच मिंथुर येथे नविन ग्रामपंचायत भवन बांधकामाला परवानगी प्राप्त झाली असुन लवकरच त्याही कामाचे भुमीपुजन लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी संजय गजपुरे यांनी दिली . यासोबतच १५ व्या वित्त आयोगातुन प्राप्त ई रिक्षा घनकचरा गाडीचे मिंथुर ग्रामपंचायतीला लोकार्पण करण्यात आले .
याप्रसंगी मिंथुर चे सरपंच नंदकिशोर करकाडे , कृऊबासचे संचालक धनराज ढोक , सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष नागोजी खोकले , ग्रा.पं. सदस्य अरविंद गजबे , देवीदास खोकले व सौ. सुनिताताई गजपुरे व गावकऱ्यांची उपस्थिती होती.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !