
विरुर स्टेशन (संतोष मडपूवार)-
वसंतराव नाईक जयंती कृषी दिनाचे निमित्याने विरुर स्टेशन पोलीस स्टेशन च्या वतीने दुर्गम भागातील बागलवाही या कोलाम वस्तीत फळ झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले ही फळझाडे प्रत्येकी कुटूंबाना जबाबदारीने संगोपन करण्याची हमी त्यांनी घेतली असून या फळ झाडापासून 3 ते 4 वर्षात उत्पन्न मिळणार आहे
या वृक्षारोपण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सतपालजी बावेजा, सतीश कोम्रेल्लीवार,अजय रेड्डी,पूर्णाचंद्र रेड्डी,विलास आक्केवार,राजेश इंद्रपवार,आदी मान्यवरासह कोलाम गुढ्याचे पाटील व इतर सदस्य अंबुजा फाउंडेशनचे पदाधीकारी ,जीवोन्नती चे कारकर्ते उपस्थित होते
याप्रसंगी या उपक्रमास सहकार्य करणाऱ्या व्यापारी,समाजसेवक,पत्रकाराचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर कोलाम वस्तीतील प्रत्येक कुटूंबाना लिबु,चिक्कू,आंबा,फणस,बिबा या झाडाचे रोपटे देऊन त्याचे रोपवन करण्यात आले मान्यवरणीही काही फळझाडे लावलीत,या फळ झाडापासून काही वर्षातच या कोलाम बांधवांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळणार आहे त्यामुळे प्रत्येकांनी ही झाडे जगविण्याची आवाहन ठाणेदार राहुल चव्हाण यांनी केले,,या प्रसंगी चालक नगराळे यांच्या नियतवयोमान नुसार सेवानिवृत्ती झालेले हवालदार बाबा रावजी नगराळे यांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन अतुल सहारे यांनी केले प्रास्ताविक ठाणेदार राहुल चव्हाण यांनी केले याप्रसंगी बरेच ,प्रतिष्ठित नागरिक,अंबुजा फाउंडेशनचे सदस्य,जीवींन्नोती विभागाचे कर्मचारी,कार्यकर्ते उपस्थित होते
