ब्रम्हपुरी रेल्वे स्टेशन परिसरातून खवल्या मांजर पकडून केले निसर्गमुक्त

42

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
आज दिनांक 2 जुलै रोजी ब्रम्हपुरी रेल्वे स्टेशन परिसरात खवल्या मांजर आढळून आले याची माहिती वन विभागाचे उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्र कार्यालयास माहिती मिळताच रेस्क्यू मोहीम राबवित त्याला पिंजऱ्यात पकडून निसर्गमुक्त करण्यात आले नर जातीचा खवल्या मांजर असून कोणतीही दुखापत झाली नसून जंगल रस्ता भरकटल्याने तो या परिसरात आला असावा असे वनपरिक्षेत्र अधिकारी रामचंद्र शेंडे यांनी सांगितले
हो रेस्क्यू मोहीम उत्तर ब्रम्हपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रामचंद्र शेंडे,क्षेत्र सहायक मिलिंद सेमस्कर,वनरक्षक बळडे,आणि इतर वनकर्मचारी,वनमजुर यांनी यशस्वीपणे राबविली.