बल्लारपूर वनक्षेत्र मार्फत जिल्हा परिषद शाळेला ई-लर्निंग संच भेट…

100

बलारपूर(संतोष कुंदोजवार)-

वनालगत असलेल्या गावांचा शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने गावातील जिल्हा परिषद शाळांत विद्यार्थ्याना सुलभ अभ्यासक्रमासाठी व शिक्षणाचा दर्जा उच्चाविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करन्याकरिता शाळेत ई लर्निंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात येत आहे त्यानुसार डाँक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनधनविकास योजने अंतर्गत मध्य चांदा वनविभागाच्या बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या केम तुकुम आणि किन्ही येथील जिल्हा परिषद शाळेत ई लर्निंग सिस्टीम देण्यात आले.

केम तुकुम येथील शाळेत ई लर्निंग सिस्टीमचे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे,बामणी (दुढोली) चे सरपंच सुभाष ताजने,उपसरपंच शेख जमील,संयुक्त वन व्यवस्थापन समीतेचे अध्यक्ष विठ्ठल कुलमेथे,मुख्याध्यासक श्री कुमरे तथा सर्व वनकर्मचारी,संयुक्त वन व्यवस्थापन समीतीचे पदाधिकारी,शिक्षक वृंद,पालक उपस्थित होते
तसेच किन्ही येथील जिल्हा परिषद शाळेत सरपंच संगीता सत्रे यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे ,पोलीस पाटील अरुण बुचे,मुख्याध्यापिका एस एम गाजरलावार, वनकर्मचारी ,शिक्षक ,उपस्थित होते