
सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पाथरी येथील गोपाळ पाटील ठीकरे यांच्या घरात आज पहाटे च्या सुमारास मोठी संरक्षक भिंत पार करून बिबट हा घरात घुसल्याची माहिती वनविभाग मिळताच वनविभाग ची चमू घटनास्थळी पोहचली व त्या बिबट ला पकडण्यासाठी रेस्क्यू आप्रेशन राबविण्यात आले.तब्बल 5 तास दडून बसलेला बिबट अखेर पिंजऱ्यात पडल्याने नागरिकांनी आंनद व्यक्त केला.यावेळी बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती यावेळी सावली वनपरिक्षेत्र चे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच पाथरी पोलीस स्टेशन चे अधिकारी कर्मचारी उपस्तीत होते.

