
घराच्या संरक्षण भिंतीवरून उडी घेवून बिबट घरात घुसल्याची धक्कादायक माहीती आज सावली तालुक्यातील पाथरी येथे घडली आहे.
सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पाथरी गावातील गोपाल ठिकरे यांच्या घरात बिबट घुसल्याची माहिती होताच या संदर्भात वनविभाग ला माहिती देण्यात आली आहे.वनविभाग ची टीम ही घटनास्थळी दाखल झाली असून बिबट ला जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
