
सावली नगरपंचायत च्या पदाधिकारी व नगरसेवकांना अंधारात ठेवून थकबाकीदाराला लिलाव प्रक्रियेत सहभागी करून बेकायदेशीर लिलाव पार पाडले असून या प्रकरणाची चौकशी करून लिलाव रद्द करावे व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सावली नगरपंचायत अंतर्गत आठवडी बाजार व गुजरी जड वाहतुक वसुली लिलाव प्रक्रिया ही १ एप्रिल २०२२ ते दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधीकरीता दिनांक २९/३/२०२२ रोजी नगरपंचायत कार्यालयात पार पडली.
सदर लिलाव प्रक्रियेमधील नरेंद्र डोहणे, सूरज बोम्मावार, शैलेश निमगडे,नरेंद्र बोरूले यांनी सहभाग घेतला.नियम व अटीची संदर्भात जाहिर पत्रक काढुन प्रसिध्दी सुध्दा करण्यात आली होती. सदर जाहिर पत्रकात अट क्र. ०९ मध्ये स्पष्ट नमुद आहे की, मागील थकबाकीदार व्यक्तीस बोली बोलता येणार नाही असे नमुद असतांना संबधीत मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी यांनी नरेंद्र डोहणे हे थकबाकीदार असतांना या बाबत ची माहिती लपविली व बोली बोलण्याची संधी देवून लिलाव ची बोली ही चढती करून आठवढी बाजार 8 लाख तर गुजरी एक लाख पन्नास हजार पर्यंत बोली बोलले.मात्र तरी लिलाव हा नरेंद बोरूले यांनी घेतला.
थकबाकीदाराने सदर लिलावातील बोली वाढवून लिलाव प्रक्रिया बेकायदेशीर पणे केली आहे. त्यामुळे अटी व नियमाचा भंग करणाऱ्या व थकबाकीदारास जाणून बुजून बोली बोलण्यास भाग पाडणाऱ्या मुख्याधिकारी व संबधीत अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करुन सदर लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशी मागणी सूरज बोम्मावार, शैलेंद्र निमगडे,नरेंद्र बोरूले यांनी नगरविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, आयुक्त, नगर प्रशासन विभाग, मुंबई,चंद्रपूर जिल्हाधिकारी जिल्हा कार्यालय, चंद्रपूर ,नगराध्यक्ष सावली यांना निवेदन देवून केली आहे.
*कोड(बॉक्स मध्ये)*
*थकबाकीदार असल्याची माहिती नाही-नगराध्यक्ष*
आठवडी व बाजार लिलाव मध्ये नियम व अटींचे पालन केलेल्यानाच सहभागी करा असे म्हटले होते. मात्र त्यात जर बेकायदेशीर रित्या थकबाकीदारचा सहभाग अधिकारी आपल्या मर्जीने करून घेतला असेल तर तो चुकीचा आहे.आमचे पदाधिकारी व नगरसेवकांची दिशाभूल करणारे आहे.असे नगराध्यक्ष लता लाकडे यांनी म्हटले आहे.
*काय आहे तर पाहून सांगतो- मुख्याधिकारी*
या संदर्भात मला काही माहिती नाही लिलाव प्रक्रिया हे नियमानुसार झालेली आहे.त्याच्या कडून चेक घेतलेला होता.यात काही चूक झाली आहे का?असेल तर आहे तर पाहून सांगतो असे मुख्यधिकारी मनीषा वजाळे यांनी म्हटले.