ट्रक अपघातात दुचाकीवरील युवक जागीच ठार ; बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील घटना

85

बल्लारपूर ,(संतोष कुंदोजवार)-

दहेली येथून काही कामानिमित्त दुचाकीने बल्लारपूर कडे येत असतानाच बामणी येथील वनउपज तपासणी नाका जवळ मागून येणाऱ्या सिमेंट भरलेल्या कॅप्सूल ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली आणि या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाला 35 वर्षीय अजय वागदरकर असे मृतकाचे नाव असून ही घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.

अपघाताची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचून पंचनामा करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला व पुढील तपास तथा कारवाई सुरू केली यावेळी बघ्याची मोठी गर्दी जमलेली होती
बल्लारपूर ते कोठारी महामार्गातील बामणी येथील राजुरा आणि कोठारी,आलापल्ली कडे जाणारा चौरस्ता आहे यामुळे या चौकात मोठी वर्दळ असते,त्यामुळे हा चौक अपघातग्रस्त झालेला आहे