Home
HomeBreaking Newsअवैध 78 गोवंश जनावरे सह दोन ट्रक पकडले

अवैध 78 गोवंश जनावरे सह दोन ट्रक पकडले

 

दि.२२/०६/२२ रोजी रात्रीदरम्यान सावली पो.स्टे हद्यीतून अवैध गोवंश जनावरे वाहतुक होणार आहे अशा गुप्त माहीतीवरून सावली टाउन येथे अचानक नाकाबंदी केली असता सकाळी अंदाजे ०७:३० च्या सुमारास मिळालेल्या गुप्त खबरेनुसार गडचिरोली दिशेकडून एकामागोमाग येणारे दोन ट्रक थांबवून पाहणी केली असता दोन्ही ट्रकमध्ये लहानमोठे एकूण ७८ गोवंश जनावरे वाहनाची क्षमता नसतांना अत्यंत निर्दयतेने, कुरपणे तोंडाला मोरके व दोराने पाय बांधून कोंबुन बसवून ठेवलेले दिसून आले.

दोन्ही ट्रकमधील मिळून ७८ गोवंश जनावरे कींमत अं ७,८०,००० रू टाटा कंपनीचे दोन ट्रक क MH 04 CU 9295 व CG 24 S 2672 कींमत २०,००,००० रू असा एकूण २७,८०,००० रू चा माल जप्त करण्यात आला. सदरचे जप्त जनावरे ही त्यांच्या सुरक्षीतता व आरोग्याच्या दृष्टीने गोशाळेत दाखल करण्यात आले.

आरोपी क १) अब्दुल राजीक अब्दुल रफीक वय ३६ वर्ष ०२) मो.अस्लम मो.आजम वय ३४ वर्ष ३) रेहनुद्यीन फकरुद्दीन वय २५ वर्ष सर्व राहणार मुर्तीजापूर जि. अकोला व ट्रक क्र CG 24 S 2672 चा फरार चालक अशा चार आरोपीतांविरूद्व महाराष्ट्र पशू संवर्धन कायदा कलम ५(अ), (ब),प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११डी, एफ ,महाराष्ट पोलीस अधिनियम कलम ११९, मोटरवाहन अधिनियम कलम ८३/१७७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कारवाई प्रभारी पोलीस अधिक्षक माखनिकर ,प्रभारी अपर पोलीस अधिक्षक शेखर देशमुख , उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे , ठाणेदार आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवालदार दर्शन लाटकर, विशाल दुर्योधन,पो.का धिरज पिदुरकर चालक पुनेश्वर कुळमेथे यांनी केली.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !