
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार महिला काँग्रेस ग्रामीण च्या जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीचे आयोजन सावली महिला तालुका काँग्रेस च्या अध्यक्षा उषा भोयर यांनी केले होते. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना नम्रता ठेमस्कर यांनी महिलांनी सक्षम होऊन स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले पाहिजे असे आवाहन केले. तसेच महिला काँग्रेस प्रत्येक गावात, प्रत्येक घरात पोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट झाले पाहिजे असे प्रतिपादन केले.
यावेळी महिला काँग्रेस च्या तालुका अध्यक्षा तसेच नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा लता लाकडे यांनी देखील महिला सक्षमीकरणा ची गरज व्यक्त करून मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महिलांनी आपल्या अडचणी जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या पुढे ठेवल्या, महिलांच्या अडचणी सोडवल्या जातील असे आश्वासन नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी यावेळी दिले.
यावेळी मनीषा जवादे ,शिलाताई म्हशाखेत्री, नगर सेविका सौ. भावाना वाढई , सिमा संतोषवर , प्रियांका रामटेके , ज्योती शिंदे , ज्योती गेडाम, अंजली देवगडे , राधा ताटकोंडावर आणी कविता मुत्यालवार , भारति चौधरी , संद्या गुरुनुले , भावना बोरकर , चांदणी मडावी , अंजली दमके , भावना बीके , योगिता बुडगलवार , ज्योती बहिरवार , संगीता गेडाम , निता दांडिकवार आणि समस्त महिला काँग्रेस कमिटी उपस्थित होते.