
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने नुकताच इयत्ता दहावी चा निकाल जाहीर करण्यात आला.

यात सावली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती शिक्षण प्रसारक संस्था सावली द्वारा संचालित तथा तालुक्यात नव्हे,तर संपूर्ण जिल्ह्यात बहुचर्चित असलेली रमाबाई आंबेडकर विद्यालयाचा निकाल 96.25% देऊन आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.विद्यालयातून पूनम दामोधर बोलीवार हिने 89.40%गुण घेऊन प्रथम, तनिषा प्रेमदास मेश्राम 88.80%गुण घेऊन द्वीतिय, श्रेया अभय दुधे 87.60%गुण घेऊन तृतीय,सुजल राजू दुधे 87.00%गुण घेऊन चतुर्थ,मृणाली मनोज शेंडे 85.20%गुण घेऊन पाचवी,साहिल भास्कर डोईजड84.80%गुण घेऊन सहावा,तर चांदणी दिलीप मडावी हिने 84.60%टक्के घेऊन सातवी येण्याचा बहुमान मिळवला.
प्राविण्य श्रेणीत 32, प्रथम श्रेणीत 46, द्वितीय श्रेणीत 60,तर पास श्रेणीत 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मंडळाचे अध्यक्ष .के.एन.बोरकर संस्था सचिव व्हि.सी.गेडाम, संचालक .सौ.चंदभागाबाई आर.गेडाम .बि.के. गोवर्धन ,.वी.के. बोरकर साहेब,डी.बि. गोवर्धन ,यु.एम.गेडाम तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.एल.शेंडे पर्यवेक्षक,.एम.डी.लाकडे,तथा सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.