मोदी सरकार च्या योजना घरोघरी पोहचवा-देवराव भोंगळे

29

 

 

भारतीय जनता पार्टी सावली तालुक्याची संगठनात्मक बैठक जे. के. पाल महाविद्यालय व्याहाड (खुर्द) येथे जिल्हा भाजपा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या अध्यक्षतखालील घेण्यात आली.

सावली तालुक्यात ९८ बुथ आणि २३ शक्ती केंद्र प्रमूख आहेत.
याठिकाणी सावली तालुक्यातील शक्ती केंद्र व बुथ समित्यांच्या रचेसंदर्भात विस्तृत चर्चा करत शक्ती केंद्र प्रमुखांच्या जबाबदारीबद्दल त्यांना सविस्तर मार्गदर्शन भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.

प्रत्येक बुथवर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करून त्यानिमित्तानं बुथची मासिक बैठक घ्यावी. उर्वरित बुथच्या रचनेसाठी सर्वांनी लक्ष घालावे, येत्या ०१ जुलैपासून आपापल्या बूथच्या बैठका प्रमुखांच्या उपस्थितीत घ्याव्या. गावाच्या कार्यकारण्या पुर्ण कराव्यात, WhatsApp ग्रुप सक्रिय करणे, पंचायत समिती सर्कलशाहा व शहरातील प्रभागाच्या बैठका घेणे, ऑगस्ट महिन्यात होणार्‍या विधानसभा निहाय मेळाव्याचे नियोजन व आंदोलनाचे तयारी, रथयात्रेची स्वागत तसेच सभांची व्यवस्था, शहरातून बाॅईकरॅली काढणे, नविन लोकांचे पक्षप्रवेश तसेच केंद्र सरकारच्या ०८ वर्षपुर्ती निमित्यानं सूरू असलेले विविध कार्यक्रम आणि तालुक्याच्या एका वैशिष्ट्यपूर्ण सेवा कार्यक्रम तसेच स्थानिक प्रश्न किंवा राज्यशासनाच्या विरोधातील एका मोठ्या आंदोलनाची तयारी करण्यासंदर्भात विविध नियोजनात्मक सुचना जिल्हा भाजपा अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी उपस्थितांना केल्या.

यासोबतच विविध घटकांना मोदी सरकारच्या योजनेची माहिती द्यावी, विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन संवाद साधावा. असेही सर्वांना सांगितले.

यासोबतच शक्ती केंद्र प्रमुखांना जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नेमप्लेट घरावरील भिंतीवर लावण्यासाठी भेट म्हणून याठीकाणी देण्यात आल्या.

या बैठकीला प्रास्तविक अध्यक्ष भाजपा तालुका सावली तथा जिल्हा अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा अविनाश पाल यांनी केले या कार्यक्रमाला जिल्हा महामंत्री संजय गजपूरे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कु. अल्काताई आत्राम, पोंभुर्णा नगराध्यक्ष सौ. सुलभाताई पीपरे, तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोम्मावार,महामंत्री दिलीप ठिकरे, जेष्ठ नेते देवराव मुद्दमवार, माजी जीप सदस्य संतोष तंगडपल्लीवार, जेष्ठ नेते प्रकाश सा. गड्डमवार, माजी जीप सदस्य भालचंद्र बोधलकर, माजी जि. प. सदस्या सौ. मनिषाताई चिमुरकर, सौ. योगीताताई डबले, माजी पं. स. सभापती सौ. छायाताई शेंडे, अर्जुन भोयर, कविंद्र रोहणकर, गणपत कोठारे, अर्जुन भोयर, रविंद्र बोलीवार, अरूण पाल, नगरसेविका सौ. निलिमाताई सुरमवार, शहराध्यक्ष आशिष कार्लेकर,माजी उपसभापती तुकाराम ठिकरे, यांचेसह तालुक्यातील सर्व शक्ती केंद्र व बुथ प्रमुख आणि आजी – माजी लोकप्रतिनिधी, जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन दिलीप ठीकरे तर आभाप्रदर्शन नगरसेवक सतीश बोमावार यांनी केले