
कवठी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारा जाहीर करण्यात आलेल्या (नागपूर विभाग) इयत्ता दहावीच्या परीक्षेत सावली तालुक्यातील कवठी येथील शहीद सुरेश पाटील सुरकर विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांच्या नियोजनबद्ध शिक्षण पद्धतीने शंभर टक्के यश मिळविले आहे.

विद्यालयातील ऐकून ३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी पास झाले असून १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १८ विद्यार्थी ७५% + गुण मिळवत पास झाले आहेत. विद्यालयातील तन्मय बंडू पुडके प्रथम ९१.२०% गुण,गोपिका शामसुंदर कोसरे द्वितीय८५.४०%, निशा प्रकाश शेन्डे तृतीय ८४.६०% गुण प्राप्त केले आहेत. विद्यालयातील सर्व विद्यार्थी सामान्य कुटुंबातील असून त्यांनी मिळविलेले यश असामान्य म्हणायला हवे.
विद्यालयाचे विद्यार्थी कु. तन्मय बंडू पुडके याने दहावीच्या परीक्षेत (मराठी माध्यम) घवघवीत यश संपादन केले आहे.
परीक्षेत ९१.२० प्रतिशत गुण घेऊन शाळेतून पहिला येण्याचा मान पटकावला आहे. पुरेसे शैक्षणिक संसाधन नसतांना व अतिशय बिकट आर्थिक स्थितीत त्याने संपादित केलेल्या यशा बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई, भाऊ, आजोबा, आजी, विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय खोब्रागडे सर, आ. हजारे सर, आ. रेकलवार सर, आ. डोंगरे सर, आ. सलामे मॅडम, व सर्व कर्मचारी वृंद यांना दिले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवल्याने पालक वर्गातुन सर्व शिक्षकांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.