
————————————————–

चंद्रपूर :- (गांधी बोरकर)
जिवती तालुक्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आदिवासी विविध सहकारी संस्था मर्यादित माराई पाटण येथिल काँग्रेस-राष्ट्रावादी काँग्रेस पार्टीचे 13 पैकी 12 उमेदवार विजयी संपादन केले.
१८ जुन रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूक आदिवासी विविध कार्यकारी सहकारी मर्यादित संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक राजुरा विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष, लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे,व जेष्ठ नेते तुकारामजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.त्यात आदिवासी सोसायटीवर अध्यक्षपदी काँग्रेसचे सत्तरशाह कोटनाके तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.पंकज पवार यांची बिनविरोध निवड झाली.
सदर निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक दोनाडकर यांच्या समक्ष पार पडली.
यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक , सुरेश निलेवाड,शंकर निखुरे ,अंबाराव कोटनाके,साक्राबाई धृर्वे,दसुंती करपते,शशीकलाबाई घंटेवाड,रमेश गुडमेवाड,बन्शी जाधव, काशीनाथ कांबळे,बंडु रेणेवाड उपस्थित होते.
विजयी झालेल्या निवडणुकीत नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना महाविकास आघाडी चे कार्यकर्ते ,कंटुजी कोटनाके, मलकुजी कोटनाके,पंडुजी पवार , राम पवार, लक्ष्मण पवार,सिताराम मडावी,ताजुद्दीन शेख,निखिल पवार सखाराम कोटनाके,बाबुलाल पवार , गणेश कदम, बालाजी फुल्लेवाड, अब्बास अली शेख, बालाजी पवार,सुनिल पवार,स्वप्नील पवार यांनी नवनिर्वाचित संचालकांना शुभेच्छा दिल्या.