ऍड. भास्कर लाडे यांची चंद्रपूर जिल्हा सैनिक समितीवर अशासकीय सदस्य पदी नियुक्ती.

156

 

नामदार विजय वडेट्टीवार, मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खान जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा मा. पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांचेकडून चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा सैनिक समिती गठित करण्यासाठी अशासकीय सदस्यांच्या नावाची अनुमती यादी प्राप्त झाल्या नुसार मा. अजय गुल्हाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी सावली येथील ऍड.भास्कर लाडे व मोखाळा येथिल जनार्धन नागापुरे, माजी सैनिक यांचे दिनांक – २५.०४.२०२२ चे आदेशान्वये अशासकीय सदस्यपदी नियुक्ती केली. समितीचे अध्यक्ष मा. अजय गुल्हाने जिल्हाधिकारी चंद्रपूर आहेत.

चंद्रपूर जिल्हा सैनिक समितीचे अशासकीय सदस्य ऍड. भास्कर लाडे यांनी जिल्ह्यातील तरुण मुलांना सैनिक भरतीत जास्तीत जास्त वाव मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे मनोदय व्यक्त केले.

चंद्रपूर जिल्हा सैनिक समितीवर अशासकीय सदस्यपदी ऍड.भास्कर लाडे यांची सदस्यपदी नियुक्ती केल्याने विजय वडेट्टीवार, पालक मंत्री चंद्रपूर जिल्हा यांचे प्रति आभार व्यक्त केले.