बोथली येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

47

 

प्राथमिक आरोग्य केंद्र बोथली तालुका सावली जिल्हा चंद्रपुर येथे आज दिनांक 16 जून ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उदघाटन श्रीमती सुशीलाताई वामनराव पाटील गड्डमवार यांचा हस्ते करण्यात आले.

तसेच प्रमूख उपस्थित जयकीसान पत संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील गडडमवार व सौ. योगीता डबले माजी जिल्हा परिषद सदस्या,सौ मनिषा चिमुरकर माजी जिल्हा परिषद सदस्या, सौ खलिता मराठे सरपंच ग्रामपंचायत बोथली व उपसरपंच सौ शेंडे मॅडम व डॉ विवेक यमजलवार वैद्यकीय अधिकारी बोथली व डॉ शैलेंद्र खराटे वैद्यकीय अधिकारी बोथली व तालुका आरोग्य सहायक भीमानवार साहेब व आरोग्य विस्तार अधिकारी मेश्राम व ताराचंद खोब्रागडे समुदाय अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

या शिबिराला चंद्रपूर येथील पंकज पवार गव्हर्नमेंट ब्लड बँक चंद्रपूर उपस्थित होते. शिबिरामध्ये 20 रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन डॉ खराटे यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामसेवक व गावांतील तरुण वर्ग व नागरिक तसेच प्रा आ केंद्र बोथली येथील सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.