
तालुका आरोग्य अधिकारी सावली या पदाच्या प्रशासकीय व वितिय प्रभार डॉ. समीर थेरे यांच्याकडे सोपविण्यात आलेला होता. मात्र डॉक्टर समीर थेरे यांचे मूळ पदस्थापना हे मूल तालुका आरोग्य अधिकारी या पदावर असल्याने त्यांना त्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर रिक्त असलेल्या सावली तालुका आरोग्य अधिकारी या पदावर डॉक्टर धनश्री ज्ञानेश्वर अवघड(मरलावार) वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहड बूज यांना सावली तालुका आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती चे यांच्याकडे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी काढलेले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून डॉ.समीर थेरे यांनी आरोग्य अधिकारी पदाची यशस्वी धुरा पार पाडली. दोन्ही कडील प्रभार लक्षात घेता त्यांना मूल येथे तर सावली तालुक्याचा प्रभार हा डॉ.धनश्री अवघड( मरलावार) यांना देण्यात आला आहे.
डॉ.धनश्री अवघड( मरलावार) गेल्या 13 वर्षापासून सावली तालुक्यातील उपरी येथे कार्यरत आहे.सावली तालुक्यातील सर्वच ठिकाणच्या प्राथमिक स्वास्थ केंद्रात रिक्त पदावर त्यांनी कार्य केले आहे.प्रशासकीय कामाचा अनुभव व नम्र असलेला स्वभाव तसेच यशस्वी आरोग्य तपासणी मुळे त्या लोकप्रिय आहेत.तसेच कोविड च्या काळातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
सावली तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर तसेच विदर्भ धनगर समाज संघर्ष समिती चे विदर्भ अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. तुषार मरलावार यांच्या डॉ.धनश्री या धर्मपत्नी आहेत. तालुका आरोग्य अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
