
श्री जे के पाल कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय व्याहाड खुर्द तालुका सावली जिल्हा चंद्रपूरचा बारावीचा निकाल यंदाही 100 टक्के लावून परंपरा कायम ठेवली आहे. अकरावी बारावी विज्ञान कॉलेज सुरू झाले तेव्हापासून सतत तीन वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून हॅट्रिक तेच मान मिळाले आहे.यावर्षी बारावीच्या निकालात श्री जे के कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात प्रथम येणाऱ्या शिल्पकार शेंडे यांना 72.50 टक्के गुण मिळाले दुसऱ्या क्रमांकावर अस्मिता खेवले 71. 67 गुण प्राप्त झाले. तसेच प्रणय निकुरे यांनी 71.50 टक्के गुण घेऊन तिसरा क्रमांक प्राप्त केला.

90 टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहे.या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे अध्यक्ष अविनाश पाल यांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. व भविष्याच्या वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी शाळेचे प्राचार्य ज्योती पाल, रोशनी साखरे मॅडम, उपस्थित होते.