
नगरसेवक प्रीतम गेडाम यांनी बंद पाडले काम

सावली शहरांमध्ये कसल्याही प्रकारची परवानगी न घेता अवैधपणे एअरटेल या कंपनीने केबल टाकण्याचे काम सुरू केल्याने समाज मंदिर परिसरात नगरसेवक प्रितम गेडाम यांनी काम बंद पाडलेले आहे.
सावली शहरांमध्ये मुख्य मार्गाचे काम झाले असतानाच त्याच बाजूला एअरटेल या कंपनीने केबल टाकण्याचे परवानगी घेतल्याचे समजले जात आहे मात्र सध्या कसल्या प्रकारची परवानगी चे कागद न दाखवता नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या जागेत केबल टाकण्याचे काम करीत आहे सदर कामाची बद्दलची माहिती वार्ड क्रमांक 2 चे नगरसेवक प्रीतम गेडाम यांनी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडे कसले प्रकारचे कागदपत्रे आढळून आले नाही त्यामुळे समाज मंदिरातुन परिसरातून होत असलेले हे खोदकाम अवैधपणे असल्याने सदर बांधकाम बंद करा असे नगरसेवक यांनी सांगितले असता सदर काम बंद करण्यात आलेले आहे.
सावली शहरातून नगर प्रशासनाच्या हद्दीत असलेले अनेक पाईप लाईन इलेक्ट्रिक सिटी चे काम आहे त्यामुळे सदर पाईपलाईन एअरटेल या कंपनीद्वारे टाकत असलेल्या पाईप लाईन मुळे त्यांना इजा होऊ शकते त्यामुळे सदर काम हे पूर्णता रोखण्यात यावे असे नगरसेवक गेडाम यांनी म्हटलेले आहे.
सदर कॉन्ट्रॅक्टर शर्मा यांना एनओसी मागितली असता तर त्याच्याकडे कुठलाही noc नसताना काम अवैधरित्या शर्मा हा आपल्या मनमानीने अधिकारात करीत आहे. बौद्ध समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार करत आहे. समाज मंदिरे आमचे आधार स्थान आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही जे वर्षानुवर्ष पारंपारिक बौद्धिक शारीरिक आणि शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात परंतु त्यांनी ती जागा निवडून भावनांशी खेळण्याचा प्रकार केलेला आहे आणि याच्या बद्दल कोणतीही माहिती न देता स्वतः मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती स्थायी समिती अध्यक्ष तथा नगरसेवक असताना मला कोणत्या प्रकारात विश्वासात न घेता अशा मनमानी प्रकार सुरू आहे.
सदर क्षेत्रामध्ये एअरटेल कंपनी द्वारे टाकत असलेली केबल संदर्भातून माहिती विचारण्यासाठी नगरसेवक रितेश गेडाम यांनी नगराध्यक्ष लाकडे यांना विचारले असता त्यांनी मला कसले प्रकारची माहिती नाही असे उत्तर मिळाले आहे.तर सावली शहरातील अनेक ठिकाणच्या कामात मुख्याधिकारी या मनमानी करीत असल्याचा आरोप नगरसेवक गेडाम यांनी केला आहे.