प्रशासनाने जप्त केला रेती साठा; अवैधपणे साठा केलेली रेती तहसील मध्ये जमा

27

$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

सावली तालुक्यातील सामदा व अंतरंगाव व परिसरात वैनगंगा नदीतून अवैधपणे रेतीचे उत्खनन करून काही ठिकाणी साठा केल्याची माहिती तहसील प्रशासनाला मिळाली होती. त्याअनुषंगाने तहसीलदार परीक्षित पाटील यांचे नेतृत्वात सागर कांबळे नायब तहसिलदार ,निखाते मंडळ अधिकारी व तलाठी या महसूल विभागाच्या पथकाने रविवार व सोमवारी जवळपास 200 ब्रास रेती जप्त करून सदर सर्व रेती तहसील कार्यालयाचे परिसरात जमा केली.

रेती चा एवढा मोठा साठा हा तहसिल कार्यालयात जमा करण्याचा प्रकार पहिल्यांदा घडलेला आहे.या जमा झालेल्या रेती चा समोर घरकुल किव्हा इतर लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती कळते