सावली ची सुनबाई झळकणार महा होम मिनिस्टर मध्ये

113

 

झी मराठी ची सर्वाधिक लोकप्रिय व महिलांच्या घरा घरात अधिराज्य करणारी आदेश बांदेकर यांची होम मिनिस्टर या लोकप्रिय मालिकेत सावलीची सुनबाई झळकणार असून 5 हजार महिलांमध्ये ती टॉप टेन पर्यंत मजल मारली आहे.येत्या काही दिवसात हा शो प्रसारीत होणात आहे.

नागपूर येथे आयोजित महा मिनिस्टर मध्ये संपुर्ण महाराष्ट्र मधून जवळपास 5 हजार महिला यात सहभागी झाल्या होत्या.या स्पर्धत सावली येथील व्यावसायिक अंकुश शेंडे यांच्या पत्नी तसेच श्रीमती वीणाताई सुधाकरजी शेंडे यांच्या सुनबाई सौ.कोमल अंकुश शेंडे सहभागी झाली. उखाणे व विविध स्पर्धेच्या माध्यमातून यातील 90 जणांची निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांना झी समूहाच्या वतीने मुबंई ला नेण्यात आले.त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून अनेक स्पर्धा पार पडल्या त्यात टॉप टेन पर्यंत ची मजल सावलीची सुनबाई सौ.कोमल अंकुश शेंडे हिने मारली आणि सावली शहराचा नाव लौकिक केले आहे.

सौ. कोमल अंकुश शेंडे हिच्या सहभागी बद्दल सावली येथील महिलांनी आनंद व्यक्त केला आहे.लवकरच त्या झी मराठी च्या होम मिनिस्टर वर झळकणार आहे.