विदर्भ पद्मशाली संघम चे माजी अध्यक्ष स्व.रामकृष्णजी जीन्नेवार यांना संघम तर्फे श्रद्धांजली

61

 

विदर्भ पद्मशाली संघम चे माजी अध्यक्ष स्वर्गीय रामकृष्णजी जीन्नेवार यांच्या दुःखद निधना बद्दल विदर्भ पद्मशाली संघम, व पद्मशाली समाज नागपूर यांच्या वतीने मार्कंडेय सभागृह नागपूर येथे भावपूर्ण श्रद्धांजली सभा घेण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ पद्मशाली संघम चे अध्यक्ष संजयजी बोम्मेवार हे होते. तसेच त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पद्मशाली समाज, नागपूरचे अध्यक्ष व माजी सभापती महानगरपालिका राजूभाऊ नागुलवार, व विदर्भ पद्मशाली महिला अध्यक्षा रश्मीताई परसावार, उपाध्यक्ष ईश्वर नंदलवार, प्राध्यापक विजय आकनुरवार, सुनील गुद्द्टवार, आनंदराव बोड्डुवार, तसेच विदर्भ पद्मशाली संघम चे सचिव राजू आनंदपवार, सुरेश पेद्दलवार, सौ.अनिताताई पेद्दलवार, तारकेश्वर उडतेवार, अनिल मामीलवार आदि समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी संजय बोम्मेवार व राजूभाऊ नागुलवार यांनी स्वर्गीय रामकृष्णजी जिन्नेवार यांच्या पद्मशाली समाज कार्याच्या योगदानाबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन करून श्रद्धांजली अर्पण केली. या श्रद्धांजली सभेचे संचालन उपाध्यक्ष प्रा. विजय आकनूरवार यांनी केले. यावेळी पद्मशाली समाज बांधव उपस्थित होते व सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.