3 वर्गात शिकणाऱ्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू

61

$$$$$$$$$$$$$$$$
$$$$$$$$$$$$$$$$
सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथे दिनांक 11 ला रात्री सात वाजताच्या दरम्यान आपल्या घराच्या पाठीमागे पाणी फेकण्यासाठी गेलेल्या नववर्ष मुलीला सापाने चावा घेतल्याने तिच्या दवाखान्यात उपचार निधन झाल्याची घटना घडलेली आहे.

सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता जिल्हा परिषद शाळेत तिसऱ्या वर्गात शिकणारी कुमारी ज्ञानेश्वरी नितेश गेडाम वय 9 वर्ष ही आपल्या घराच्या पाठीमागे पाणी फेकण्यासाठी गेली असता त्या ठिकाणी असलेल्या विषारी सापाने कु.ज्ञानेश्वरी च्या पायाला चावा घेतला त्यानंतर ती आपल्या आई ला सांगितली.

तिच्यावर उपचार साठी बोथली प्राथमिक स्वास्थ केंद्रात भरती केले.मात्र परिस्थिती गंभीर पाहता तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.उपचार सुरू झाले.मात्र उपचारार्थ तिचे निधन झाले. तिच्यावर आज शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले.नितेश गेडाम ला मोठा मुलगा असून ही लहान मुलगी होती.तिच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.