ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची वीज बिल शासनाने भरावे; राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य यांची शासनाकडे मागणी

39

 

ऑक्टोंबर २०२१ पर्यंत ग्रामपंचायत अंतर्गत गावातील पथदिव्यांची विद्युत बिल शासनाने भरलेले असून त्यानंतरचे वीज ग्रामपंचायतींनी भरावे असे निर्देश दिल्याने वीज बिल थकीत आहेत.बिल थकीत असल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ज्या गावांचे वीज बिल थकीत आहेत त्या गावातील पथदिव्यांची वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा सुरू केलेला असून यामुळे असंख्य गावे अंधारात जात आहेत त्यामुळे पूर्वीप्रमाणेच राज्य सरकारने ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांच्या वीज बिलाचा भरणा करावा अशी मागणी ग्रा प सदस्य राकेश गोलेपेलीवार यानी केलेआहे.

जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीकडे १५ वा वित्त व ग्रामनिधी व्यतिरिक्त कोणताही निधी नाही. १५ वा वित्त निधी व ग्रामनिधी हा शासन प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार सूचनेनुसार नियोजित करून आराखड्यानुसार खर्च करण्याचे बंधन ग्रामपंचायतींना आहे. त्यामुळे पथदिव्यांचा विज बिल कुठून भरावा असा प्रश्न ग्रामपंचायतील पुढे निर्माण झालेला असून कोणत्याही ग्रामपंचायतीला या पथदिव्यांचे विद्युत बिल भरणे शक्य नाही.

सावली तालुका ग्रामीन भागांमध्ये असामाजिक तत्त्वांचा प्रभाव अधिक असून जिल्ह्यात वन्यप्राणी यांच्याकडूनही विजे अभावी होणाऱ्या अंधारामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा अनुचित घटना घडल्यास त्यास राज्यसरकार सर्वस्वी जबाबदार राहील. असे झाल्यास संपूर्ण जिल्ह्यामध्ये शासन प्रशासनाविषयी असंतोष वाढण्याची शक्यता ही मोठी आहे . भविष्यात अनुचित घटना होऊ नये याकरिता शासनाने सदर बिल भरणे आवश्यक आहे. करिता या पथदिव्यांची थकीत वीज बिल शासनाने भरावे अशी मागणी ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केले आहे.

सध्या पाऊसाचे दिवस सुरुवात झाले असुन ग्रामीन भागातील ग्रा प विज बिल न भरल्यामुळे अनेक ग्रा प तील स्टेट लाईट विज कनेक्सन बंद करण्यात आल्याने ग्रामीन भागातील जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत असुन शासनाने दखल घेवुन ग्रामीन भागातील ग्रा प अतर्गत विज बंद केलेले कनेक्सन त्वरीत जोडण्यात येवुन जिवित हानी होण्यापासुन बचाव करण्यात यावी अशी मागणी ग्रा प सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार जिबगांव यांनी केले आहेत