
पहाटे च्या सुमारास अवैध गोवंश वाहतूक होत असल्याचे मिळालेल्या माहिती वरून खेडी फाटा येथे सावली पोलिसांनी नाकाबंदी केली असता MH 34 BG09890 या आयशर ट्रक एकूण 34 गोवंश जनावरे अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आले.

पो.स्टे सावली येथे दोन आरोपींवर महा.पशू संरक्षण अधि, प्राणी छळ प्रति.अधि , महा.पोलीस अधि, मोटर.वाहन.कायदा च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मिळून आलेले वाहन व जनावरे असा एकूण 18 लाख 40 हजार रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्ह्यातील मिळून आलेल्या एका आरोपीस अटक करून त्यास मा.न्यायालयाकडून mcr वर मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिका अर्जुन इंगळे,ठाणेदार आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दर्शन लाटकर,मोहन दासरवार,धीरज पिदुरकर,चालक मरस्कोल्हे यांनी केली आहे.
सावली च्या ठाणेदार पदी आशिष बोरकर हे रुजू झाल्यापासून ते सध्या गोवंश तस्करीवर आपले लक्ष केंद्रित केले असून आत्ता पर्यंत त्यांनी 3 मोठ्या कारवाई केल्याने गोवंश तस्करी करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे.