सावलीची कु. मेहेक शेंडे बारावीच्या परीक्षेत मराठी विषयात जिल्ह्यात प्रथम

70

 

 

नुकताच एच .एस .सी .बोर्डाचा निकाल जाहीर झाला.
यात अनेक विद्यार्थ्यांनी नैपुण्य प्राप्त केले. या निकालात संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून कुमारी मेहेक शेंडे सावली या विद्यार्थिनीने मराठी विषयात १०० पैकी ९६ गुण प्राप्त करून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी डॉ. ज्ञानेश हटवार यांनी कु. मेहेक चे अभिनंदन केले.

मराठी ही मातृभाषा असून या विषयात विद्यार्थ्यांना नैपुण्य प्राप्त करने काहीच कठीण नाही , हे कु. मेहेक शेंडे यांनी सिद्ध केलेले आहे. विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथील ही विद्यार्थिनी असून प्राध्यापक आर .व्ही. केदार यांचे तिला मार्गदर्शन लाभले
आहे.

याच कनिष्ठ महाविद्यालयातील कुमारी सुप्रिया अशोक कोसमशिले, तसेच केतन विस्तारी कोरेवार या दोन्ही विद्यार्थ्यांनी मराठी विषयात १०० पैकी ९५ गुण प्राप्त केले.
कुमारी आचल ईश्वर धात्रक , सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय , सिंदेवाही या विद्यार्थिनीने सुद्धा मराठी विषयात १०० पैकी ९५ गुण प्राप्त केले आहे.

प्रा. मेश्राम सर यांचे या विद्यार्थिनीला मार्गदर्शन लाभले. तसेच कुमारी प्रगती दिलीप झोडे ,ज्ञानेश महाविद्यालय ,नवरगाव या विद्यार्थिनीला सुद्धा मराठी विषयात १०० पैकी गुण ९५ गुण मिळाले आहेत. मराठी विषयाचे प्रा.श्री गाहाणे सर यांचे या विद्यार्थिनीला मार्गदर्शन लाभले . हे चारही विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्यातुन मराठी या विषयात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत मराठी या विषयात ९० च्या वर गुण प्राप्त केले आहेत.

मागील दोन वर्षापासून महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेच्या समृद्धीसाठी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. मराठी विषयाच्या प्राध्यापकां
सोबतच विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन या संघटने मार्फत सातत्याने केले जाते. याचीच फलश्रुती म्हणून आज महाराष्ट्रात बारावीच्या निकालात मराठी विषयाच्या निकालानी उच्चांक गाठला आहे .ही या संघटने साठी व मराठी विषयासाठी फार मोठी उपलब्धी आहे.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील डिसले सर, सचिव प्राध्यापक बाळासाहेब माने सर, कार्याध्यक्ष संपतराव गर्जे सर, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर ज्ञानेश हटवार ,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सुधीर मोते, उपाध्यक्ष डॉक्टर माधवी भट , सचिव नरेंद्र विखार व संपूर्ण राज्य कार्यकारिणी, संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुका कार्यकारिणी कडून गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.