सावली तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी जीबगावचे सरपंच पुरुषोत्तम चुधरी यांची निवड

36

 

सावली तालुका सरपंच संघटनेची कार्यकारणी निवड सभा माजी सभापती विजय कोरेवार यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
संघटनेच्या अध्यक्षपदी जिबगावचे सरपंच पुरुषोत्तम चुधरी यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी चिखलीचे सरपंच रेखाताई बानबले, सचिव अंतरगावचे सरपंच कविंद्रजी लाकडे, कोषाध्यक्ष पदी गेवरा खुर्द चे सरपंच उषाताई आभारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.