सावली नगरपंचायत स्वच्छता अभियान2022 मध्ये सहभागी….टीम ला दाखविण्यासाठी फक्त शो बाजी?

43

 

 

सावली नगर पंचायत सध्या स्वच्छतेच्या बाबतीत थ्री स्टार रँक मध्ये असतानाच पुन्हा आपली रँक वाढविण्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छता अभियान 2022 मध्ये सहभागी झालेली आहे मात्र थ्री स्टार रँकिंगमध्ये पुरस्कार प्राप्त करणारी सावली नगरपंचायत यांनी मात्र सावली शहराचा स्वच्छतेकडे पूर्णता दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या सावली शहरात दिसत आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या अभियानात सहभागी होऊन सावली शहर स्वच्छ न करता फक्त देखावा तयार करून चक्क सावली कर यांची फसवणूक करीत असल्याचा प्रकार या निमित्ताने पुढे आलेला आहे.

सावली शहरात सार्वजनिक शौचालय हे फक्त चमू येण्याच्या दोन दिवस अगोदरच चांगले बनत असतात मात्र यावर्षी तेही शौचालय पूर्णता दुर्गंधीने पडून आहे तसेच त्या ठिकाणी अयोग्य असे जंत असलेले पाणी सुद्धा आहे. त्याचप्रमाणे शुद्ध पिण्याचे पाणी व थंड पिण्याचे पाणी साठी 24 लाख रुपये खर्च करून वॉटर एटीएम तयार करण्यात आले मात्र तेसुद्धा बंद असून तिथेही कचरा व घाण साचली आहे.

तसेच सावली शहरातील अनेक प्रभागांमध्ये अस्वच्छतेच्या बाजार असतानाच सावली नगरपंचायत मात्र आम्ही स्वच्छतेत पुढारलेला आहो असे दाखवून या सर्वेक्षणात सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. ओला कचरा सुका कचरा यासंदर्भात सावलीकरांना माहिती देवून त्यांना कचरा जमा करण्यासाठी बादली देने आवश्यक असतांनाच फक्त कागदावरच हे अभियान राबवत असल्याचे दिसून येत आहे.

स्वच्छ सर्वेक्षण करण्यासाठी आलेली चमू ला फक्त वर वर दाखवून त्यांना सावली शहरातील अनेक नागरिकांना माहिती देत असल्याचे सांगून त्यांचा आधार कार्ड चा फोटो व परिवार चा फोटो घेत असल्याचे कळते. मात्र माहिती ऑनलाईन काय भरत आहे याची माहिती ही टीम न देत असल्याने साशंकता वाढलेली आहे.

तसेच या संदर्भात सावली शहरात जुन्या असलेल्या वॉल पेंटिंग ला 2021 खोडून 2022 केल्याचा निंदनीय प्रकार सुद्धा नगरपंचायतीने केल्याचे निदर्शनास आलेले आहे.

स्वच्छतेसाठी लाखो रुपये शासन खर्च करीत आहे मात्र याकडे सावली नगरपंचायत हे फक्त कागदोपत्री दाखवून पुरस्कार प्राप्त करण्यासाठी धडपड करीत असल्याचा दिसून येत आहे.

याकडे शासन स्तरावर ची एक चांगली चमू येऊन सावली शहर खरंच स्वच्छ आहे का? सावली नगरपंचायत खरंच याकडे लक्ष देत आहे का? मुख्य अधिकारी व पदाधिकारी खरंच यांचे लक्ष आहे का? गांडूळ खत प्रकल्प कचरा व्यवस्थापन खरंच या ठिकाणी होत आहे का? या सर्व बाबीकडे लक्ष देऊन पहावे अशी विनंती सावलीकर यांनी केली आहे.