विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावलीची उज्वल निकालाची परंपरा कायम

58

विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावलीने आपली उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले आहे .उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला विभागाचा एकूण निकाल 99.18% असुन कु. तनुजा अनिल गेडाम या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकवित 82 टक्के गुण मिळविले आहे. द्वितीय क्रमांक कु.प्राजक्ता गजानन चौधरी 81.66 टक्के गुण आणि तृतीय क्रमांक सुशांत मोहन शिंदे या विद्यार्थाने 81.33% गुण मिळवले आहे .

विज्ञान विभागाचा एकूण निकाल 100% लागला असून विज्ञान विभागातून प्रथम क्रमांक हिमांशू रवींद्र कोटरंगे 92 % गुण मिळवून पटकविला आहे .द्वितीय क्रमांक कु. गुणगुण संजय कोतकोंडावार 86.83 % गुण व तृतीय क्रमांक विहंग प्रशांत दंडावार 83. 36 %गुण या विद्यार्थाने मिळविले आहे. विज्ञान विभागातून 16 विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले. एच .एस. सी. व्ही.सी. विभागातून स्वरूप मनोज मराठे याने 77.50% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकविले.द्वितीय क्रमांक हेमंत संतोष मेश्राम 65.16 %गुण घेऊन पटकविले आहे .आणि तृतीय क्रमांक मिलिंद जगन्नाथ गद्देकार 61.80% गुण घेऊन पटकविले आहे.
वाणिज्य विभागातून प्रथम क्रमांक कु. जानवी सुधाकर बद्दमवार 86.83 %गुण या विद्यार्थ्यीनिने पटकविला आहे तर द्वितीय क्रमांक कुंदन लहानुजी कोटरंगे 77.05 %गुण या विद्यार्थ्यांने मिळविला आहे .तृतीय क्रमांक लखन गजेंद्र चौधरी 71.33 % गुण या विद्यार्थ्याने मिळवले आहे.
विज्ञान विभागातून हिमांशू रविंद्र कोटरंगे याने 92%गुण घेऊन सावली तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तरी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली चे अध्यक्ष मान. संदीप भाऊ गड्डमवार ,उपाध्यक्षा सौ. नंदाताई अल्लुरवार, उपाध्यक्ष मान. अनिलभाऊ स्वामी सचिव मान.राजाबाळ पाटील संगीडवार कोषाध्यक्ष डॉ.विजयराव शेंडे आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक आर .एस मुप्पावार सर आणि पर्यवेक्षक ए.के.राउत सर तथा सर्व शिक्षक कर्मचारी वृंद्धानी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे .