सावली चा हिमांशू 92 टक्के गुण घेत तालुक्यातून प्रथम

61

 

आज बारावीचा निकाल जाहीर झाला असतानाच या मध्ये विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थी हिमांशू रवींद्र कोटरंगे त्याने 92 टक्के गुण तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ज्ञानज्योती फाउंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालय मध्ये नियमित अभ्यास करणारा हिमांशू हा विद्यार्थी होता त्याने केलेल्या यशाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

आज भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष संदीप गड्डमवार संस्थेचे सचिव राजा बाळ पाटील संगीळवार प्राचार्य रवींद्र मुप्पावार आधी जणांनी हिमांशू याचा पालकासह सत्कार केलेला आहे.त्यामुळे आज सावली तालुक्यात विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव लौकिक झाले आहे.विध्यार्थी यांचा नियमित सराव व त्यांच्या कडून अभ्यास करवून घेत असल्याने शाळेचा निकाल हा उत्कृष्ट लागला असल्याची प्रतिक्रिया प्राचार्य रवींद्र मुप्पावार यांनी दिली आहे.