विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी अनिल स्वामी तर उपाध्यक्षपदी चरणदास बोम्मावार यांची अविरोध निवड

62

 

सावली(प्रतिनिधी)
सावली तालुक्यातील अग्रगण्य असलेली विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित सावली च्या संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. यावेळी शेतकरी सहकारी पॅनल सर्व 13 संचालक निवडुन आले होते.

आज (दि 8) रोजी सदर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. त्यात संस्थेच्या अध्यक्ष पदी अनिल स्वामी तर उपाध्यक्ष पदी चरणदास बोम्मावार यांची अविरोध निवड झाली.

 

सदर निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक निर्णय अधिकारी मनीष जाधव यांच्या समक्ष पार पडली. अनिल स्वामी यांनी सलग दोनदा या संस्थेचे अध्यक्ष पद भूषविले हे विशेष.

 

यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक प्रशांत गाडेवार, प्रवीण सुरमवार, मंगल प्रधाने, मुरलीधर चौधरी, पराग सोनूले,डीलक्स डोहने, भुवनेश्वर बोरकर, वामन भोपये, ईश्वर मोहूर्ले, लताताई आकुलवार, योगिता ताई गेडाम उपस्थित होते.

यावेळी हार,पुष्पगुच्छ व पेढा भरवून अभिनंदन करण्यात आले यावेळी न.पं.कांग्रेस चे गटनेते तथा उपाध्यक्ष संदीप पुण्यपवार, भाजपा गटनेते तथा नगरसेवक सतीश बोम्मावार,नगरसेवक प्रीतम गेडाम, शेतकरी राईस मिल चे अध्यक्ष मोहन गाडेवार,चंद्रकांत गेडाम, निखिल दुधे,अरविंद भैसारे,यांच्या सह आदी जण उपस्थित होते.