पारडी ठवरे येथे बौध्द विहार सौंदर्यीकरणासाठी निधी मंजुर …

39

=================
नागभीड तालुक्यातील पारडी ठवरे येथील बौध्द विहाराचे सौंदर्यीकरणासाठी जि. प. च्या समाजकल्याण निधीतुन निधी मंजुर झाला असुन या कामाचे भुमीपुजन भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व पारडी – मिंडाळा – बाळापुर जि. प. क्षेत्राचे सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
संजय गजपुरे यांच्या पाठपुरावा व प्रयत्नांनी या जिल्हा परिषद क्षेत्रात कोट्यावधी रुपयांची विकासकामे पुर्णत्वास आलेली आहेत . पारडी ठवरे येथे जि.प. प्राथमिक शाळेच्या विज्ञान वर्गखोलीचे बांधकाम पुर्ण होत आले असुन मोठ्या प्रमाणावर विविध विकास कामे संजय गजपुरे यांच्या पाठपुराव्याने करण्यात आलेली आहेत . याआधी पारडी ठवरे येथील डॅा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण समाजकल्याण निधीतुन तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण खनिज निधीतुन करुन घेतले आहे .

यावर्षी समाजकल्याण निधीतुन बाळापुर ( बुज.) येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व मिंडाळा येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सौंदर्यीकरणास समाजकल्याण निधीतुन मंजुरी प्राप्त झालेली आहे. तर नवेगाव पांडव येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सौंदर्यीकरणाचे काम याआधीच पुर्ण झाले आहे.
पारडी ठवरे येथील बौध्दविहार सौंदर्यीकरण भुमीपुजन प्रसंगी उपसरपंच नंदकिशोर खोब्रागडे , ग्रामपंचायत सदस्य निकेश शेंडे , सौ. सुनिताताई दिवाकर ठवरे व सौ. दर्शनाताई गजभिये , बुथ प्रमुख रतिरामजी ठवरे व अमोल सारये , भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय सारये , बौध्द समाज महिला अध्यक्ष करुणाताई सोनडवले व सचिव दीपाताई बागडे यांची उपस्थिती होती.

पारडी ठवरे गावासाठी समाजकल्याण निधी मंजुर करुन दिल्याबद्दल जि.प.समाजकल्याण सभापती नागराज गेडाम व जि.प. सदस्य संजय गजपुरे यांचे सरपंच युवराज दोनोडे व ग्रा.पं. सदस्य तथा बौध्द समाजबांधवांनी आभार मानले आहे.